भारतीय सिनेसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय कलाकार म्हणजे मराठमोळा अभिनेता ‘शिव ठाकरे’. शिवने अगदी शून्यातून आज भले मोठे विश्व निर्माण केले आहे.
बिग बॉस माराठीच्या दुसऱ्या पर्वातून तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. तसेच या पर्वाचा विजेता झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. त्यांनतर अगदी काहीच दिवसांत शिव हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वात सहभागी झाला. अगदी एका स्थानावरून त्याचे विजेतेपद जरी हुकले असेल तरी या शोमधून तो देशभरात पोहोचला.
हिंदी बिग बॉसनंतर शिव लगेचच रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’ या लोकप्रिय शोच्या १३व्या पर्वात सहभागी झाला आहे. वेगवेगळे आणि धाडसी स्टंट असलेल्या या शोमध्ये शिवमुळे चांगलीच रंगत आली आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मने जिंकून घेत आहे. पण आता मात्र एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
शिव लवकरच या शोमधून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण म्हणजे नुकताच सुरु झालेला एमटीव्हीवरील रोडिज १९ हा रिऍलिटी शो. रोडिज या शोचे आणि शिवचे खूपच खास कनेक्शन आहे. या शोपासूनच त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतू जर शिव रोडिजच्या १९व्या पर्वात दिसणार असेल तर तो खतरो के खिलाडीमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा : या तीन अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर ‘क्रिती सेनॉन’च्या पदरी पडला आदिपुरुष सिनेमा
परंतू आता मात्र एमटीव्ही रोडिजच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे त्यामुळे आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कर्म या कांड अशी रोडिजच्या या पर्वाची थिम आहे. तर या शोमध्ये गौतम गुलाटी, प्रिन्स नरूला आणि रिया चक्रवर्ती हे गँगलीडर म्हणून सहभागी झाले आहेत. तर आता यांच्यासोबत आपला लाडका शिव ठाकरे सुद्धा गँगलीडर सामील झाला आहे. तर सोनू सुद या शोच्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
रोडिजच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सोनू सुद, रिया चक्रवर्ती,गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरूला यांच्याबरोबर शिव ठाकरे देखील दिसत आहे. ही पोस्ट करत लिहिले की, “खूप वाट बघावी लागली ना…बघा आपला शिव आला आहे…” त्यामुळे शिवचे चाहते भलतेच खुश आहेत.