केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. आत्तापर्यंतचे त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे लोकप्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वीचं त्यांचे दोन नवेकोरे सिनेमे प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांनी त्यांच्या या दोन्ही सिनेमांना अगदी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी अगदीच डोक्यावर घेतले होते. त्यांचा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत कलाकारांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
केदार शिंदे यांचा २९ जूनला प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट पाहायला गेलेले आदेश बांदेकर देखील हा चित्रपट पाहून भारावून गेले आहेत.
View this post on Instagram
हा चित्रपट पहिल्यानंतर आदेश बांदेकर यांनी भाऊक होऊन थेट केदार शिंदे यांना मिठी मारली तशी त्यांची मैत्री फार जुनी आहे. ते दोघे नेहमीच एकमेकांच कौतुक करत असतात. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर आदेश बांदेकर यांना केदार शिंदे यांचे खूप कौतुक वाटत आहे. केदार शिंदे हे ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियावरून अनेक पोस्ट शेअर करत असतात.
केदार शिंदे यांनी त्या दोघांचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “गेली कित्येक वर्षे ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणाऱ्या आदेश बांदेकरने काल बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय.” केदार यांनी लिहिलेल्या या पोस्टवर आता चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.