महाराष्ट्र राज्य शासना तर्फे दिला जाणारा सर्वात महत्वाचा आणि प्रतिष्टित पुरस्कार म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’. काळ म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी ‘५७ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा पार पडला. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अनेक दिग्गज नेतेमंडळी देखील कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री दीपक केसकर उपस्थित होते. यामध्ये अनेक मानाचे पुरस्कार देण्यात आले. ते पुढीलप्रमाणे.
01
of 15
महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला.
01
of 15
02
of 15
‘गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर पुरस्कार-२०२२’ हा पुरस्कार जेष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला.
02
of 15
03
of 15
२०२० चा ‘स्व. राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती ‘श्रीमती अरुणा इराणी’ यांना प्रदान करण्यात आला.
03
of 15
04
of 15
२०२१ चा ‘स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते ‘मिथुन चक्रवर्ती’ यांना प्रदान करण्यात आला.
04
of 15
05
of 15
२०२२ चा ‘स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री ‘हेलन’ यांना प्रदान करण्यात आला.
05
of 15
06
of 15
२०२२ चा ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक ‘नागराज मंजुळे’ यांना प्रदान करण्यात आले.
06
of 15
07
of 15
२०२० चा ‘व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते कै.रवींद्र महाजनी यांना जाहीर केला, त्यांच्या वतीने मुलाने म्हणजे गश्मीर महाजनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
07
of 15
08
of 15
२०२० चा ‘व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना जाहीर करण्यात आला, त्यांच्या वतीने विजय कोंडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
08
of 15
09
of 15
२०२२ चा ‘व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना प्रदान करण्यात आला.
09
of 15
10
of 15
२०२१ चा ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार’ सोनू निगम यांना प्रदान करण्यात आला.
10
of 15
11
of 15
‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ हा पुरस्कार विक्रम फडणीस यांना ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
11
of 15
12
of 15
‘सर्वोत्कृष्ट संवाद’ हा पुरस्कार इरावती कर्णीकला ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
12
of 15
13
of 15
‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता’हा पुरस्कार पार्थ भालेराव याला ‘बस्ता’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
13
of 15
14
of 15
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मृण्मयी देशपांडे हिला ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
14
of 15
15
of 15
सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार दीपक डोबरियाल याला ‘बाबा’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
15
of 15
हे देखील वाचा: अभिनयाचे सम्राट अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान; म्हणाले, “तुमचे उपकार…”