प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोचा आठवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विविध सेलिब्रिटी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावताना दिसणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. येत्या २६ ऑक्टोबरपासून हा शो सुरू होणार असून या शो चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
या शोमध्ये करण स्पर्धकांना विविध प्रश्न विचारत असतो. या शोमध्ये बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय जोडीने म्हणजेच दीपिका पादुकोण व रणवीर सिंग हजेरी लावली आहे. शोमध्ये त्या दोघांनी यावेळी मोठा खुलासा केला. करणने त्यांना साखरपुड्याविषयी काही प्रश्न विचारला असता, लग्नाच्या तीन वर्षाआधीच साखरपुडा उरकला होता का? असा प्रश्न करणने विचारला होता.
त्यावर रणवीरने उत्तर दिले होते की, “मी तिला २०१५ मध्येच प्रपोज केलं होतं. दुसरी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याआधीच मी विचार केला की आपणच आधी बुकिंग केलेली बरी.” हे ऐकल्यानंतर दीपिका म्हणते ‘अॅडव्हान्स बुकिंग.’ त्यानंतर करण आणि रणवीरसुद्धा हसू लागतात. या प्रोमोमध्ये दीपिकाला करणने असाही प्रश्न विचारला की, “तू रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या रॉकी रंधावाच्या भूमिकेसारख्या व्यक्तीला डेट करशील का?” त्यावर दीपिका मजेशीरपणे म्हणते, “मी रॉकी रंधावाशीच लग्न केलं आहे.”
दीपिका व रणवीरने २०१८ ला इटलीमध्ये लग्न केले त्यांच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नाच्या आधी जवळपास ते सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दोघांमधील जवळीक वाढली.
व्हायरल व्हिडिओमध्ये करणने दीपिकाला रणवीर शिवाय कोणासोबत केमिस्ट्री करायला आवडते असा प्रश्न विचारला होता. तिने हृतिक रोशनच नाव घेतलं व तिला ह्रितीक सोबत केमिस्ट्री चांगली जमते, असं ती म्हणाली.